एस. वी.रोड नागरिकांचा अभय पाटील यांना जाहीर पाठिंबा

बेळगाव:

कोरोनाच्या काळात भाजपच्या कार्यकर्त्यांनी आपले आयुष्य बाजूला ठेवून लोकांची सेवा केली आहे. जनतेचा सेवक म्हणून कार्यरत राहण्यासाठी आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहोत मतदारांनी सातत्याने साथ दिली आहे त्याचप्रमाणे यापुढील काळात देखील आपल्याला निश्चितच मतदारांचे पाठबळ लाभेल असा विश्वास अभय पाटील यांनी एस. वि. रोड येथे प्रचार सभेत सांगितले .

पुढे ते म्हणाले पिण्याच्या पाण्याचा नियमित आणि सक्षम पुरवठा करण्यात यावा यासाठी व्यापक योजना सक्रिय झाली असल्याचे आणि शहरातील अनगोळ, वडगाव, शहापूर, हिंदवाडी टिळकवाडी या भागातील पाणीपुरवठ्यासाठी मागील अनेक वर्षात योग्य नियोजन झाले नव्हते. आता यापुढील काळात ते करण्यासाठी योग्य व्यवस्था करण्यात आली आहे .तसेच अनगोळ नाक्याजवळ मोठ्या टाकीचे बांधकाम जवळपास पूर्ण झाले आहे. या माध्यमातून दररोज पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी आपल्या कार्यकाळात केलेल्या विकास कार्यक्रमांची माहिती दिली.

उपस्थित असलेले नागरीक अपली बिन शर्यत पाठिंबा जाहीर केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous post सर्व प्रकारच्या मेडियांवर लक्ष ठेवा…
Next post फरारी अमृतपाल सिंगला अटक