खानापूर :
आचारसंहिता लागल्यापासून निवडणूक आयोगाने अनेक कडक निर्बंध घालून प्रचार अथवा बॅनरबाजीवर करडी नजर ठेवली आहे. खानापूरातील समिती संपर्क कार्यालयाचे नामफलकावर आक्षेप घेत निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी फलक सक्तीने काढला आहे.
नगरपंचायतीची रीतसर परवानगी घेऊन संपर्क कार्यालयाचा फलक लावला असताना हा फलक अवैध कसा असू शकतो असा जाब समिती पदाधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना विचारले असता संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले की, आपण निवडणूक आयोगाच्या नियमावलीचे पालन करीत आहोत.
निवडणूक आयोगाच्या नियमाच्या चौकटीत बसणाऱ्या आकाराचे नामफलक बसावा. तत्पूर्वी निवडणूक अधिकाऱ्यांची रीतसर परवानगी घ्यावी नंतरच फलक बसवावा असे सांगत त्यांनी तो फलक काढला.