मतदरांच्या मनातले संजय दादा आता हातावर उमटले
बेळगाव :
जिल्ह्यात सर्वाधिक व्होल्टेज ग्रामीण मतदारसंघातील निवडणुकिचा उष्मा वाढत असताना माजी आमदार भाजप अध्यक्ष संजय पाटील यांचे छायाचित्र एका तरुणने आपल्या उजव्या हातावर कायम स्वरुपी गोंदवून घेतला आहे.
हनुमान जयंती आणि भाजप स्थापना दिनानिमित्त ग्रामीण भागातील बडस के.एच गावातील भाजपचा एक निष्ठावंत कार्यकर्ता सुनील दलवाई याने आपल्या नेत्यासाठी निवडणूक जिंकण्याची आकांक्षा हाती घेतली आहे.
हनुमानाने नेहमी आपल्या गुरु रामाच्या सेवेत स्वतःला झोकून दिल्याने माझा नायक संजय पाटील यांच्या स्मरणार्थ आणि हनुमानाने त्यांना जिंकण्याची शक्ती देवो अशी प्रार्थना करण्यासाठी संजय पाटील यांचा छायाचित्र उजव्या हातावर कायम स्वरुपी गोंदवून घेतला आहे असे त्यांनी सांगितले.