बेळगाव :
बेळगाव ग्रामीण मतदार संघासाठी मार्कंडेय साखर कारखान्याचे संचालक, महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते आर. आय. पाटील यांनी उमेदवारीसाठी अर्ज केला आहे. ऍड. राजाभाऊ पाटील, माजी आमदार मनोहर किणेकर, चिटणीस ऍड. एम. जी. पाटील, चिटणीस मनोहर संताजी यांनी अर्जाचा स्वीकार केला आहे. शुक्रवार दिनांक ७ रोजी कॉलेज रोडवरील तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यालयात हा अर्ज दाखल करण्यात आला. यावेळी बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशा घोषणाही देण्यात आल्या.
यावेळी ऍड. सुधीर बिर्जे, बी. डी. मोहनगेकर, यल्लाप्पा पाटील, बी. एस. पाटील, एस. एल. चौगुले, माजी जिल्हा पंचायत सदस्य सरस्वती पाटील, रवी पाटील, भाऊ पाटील, भरत पाटील, नारायण सांगावकर आदी महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.