खानापूर शिवसेनेचे उमेदवार के. पी. पाटील
खानापूर
शिवसेनेने कर्नाटकातील निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला असून याबाबत कर्नाटकच्या निवडणूक आयोगाकडे याबाबत लेखी माहिती देऊन, मशाल हे चिन्ह निवडणुकीसाठी वापरण्यास अनुमती देण्यात यावी, असे पत्र दिले असल्याची माहिती शिवसेनेचे कर्नाटकचे उपाध्यक्ष के. पी. पाटील मुंबई : के. पी. पाटील यांना बी फॉर्म सुपूर्द करताना खासदार अनिल देसाई यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना दिली.तसेच खानापूर मतदारसंघासाठी आपली उमेदवारी शिवसेनेने जाहीर केली असून बी फॉर्मही देण्यात आला आहे, असे सांगितले.
खासदार अनिल देसाई यांनी शनिवारी मुंबई येथे शिवसेनेचे नेते के. पी. पाटील यांना बी फॉर्म सुपूर्द केला. यापूर्वी खासदार संजय राऊत कर्नाटकातील आगामी विधानसभा व इतर शिवसेना नेत्यांची भेट घेऊन निवडणुकीविषयी प्रदीर्घ चर्चा केल्याची माहिती पाटील यांनी दिली.