“सावकार” मुळे भाजपच्या उमेदवार निवडीत अडचण
बंगळूर : भाजपच्या कोअर कमिटीच्या झालेल्या बैठकी तबेळगाव आणि किनारपट्टी भाग वगळता राज्यातील उमेदवारांची यादी पूर्ण झाली असून ती यादी केंद्रीय निवड समितीकडे पाठवण्यात आली आहे. बेंगलोर येथे झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, प्रदेशाध्यक्ष नलिन कुमार कटील, माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा, राज्य प्रभारी अरुण सिंग यांच्यासह सर्व जिल्ह्यांचे पालकमंत्री उपस्थित होते.
राज्यातल्या 224 मतदार संघातून अभिप्राय मागविण्यात आले होते. त्यावर आधारून कमिटीने उमेदवारी यादी तयार करून, केंद्रीय निवड समितीकडे रवाना केली आहे. 7 एप्रिल रोजी दिल्ली येथे भाजप संसदीय मंडळाची सभा होणार आहे. तेव्हा उमेदवारी अर्ज निश्चित करण्यात येणार आहे. आठ एप्रिल पर्यंत पहिली यादी जाहीर केली जाणार आहे. तर दुसरी यादी दहा एप्रिल पर्यंत जाहीर केली जाणार आहे.
बेळगाव जिल्ह्यात उमेदवारी यादी बाबत अनेक अडचणीयेत आहेत. रमेश जारकीहोळी यांनी काही जागांवर आपण सुचवलेल्या उमेदवारांनाच उमेदवारी जाहीर करावी अशी भूमिका घेतली आहे. त्याला लक्ष्मण सवदी, खासदार अण्णासाहेब जोल्ले आणि इराण्णा कडाडी यांनी तीव्र विरोध केला आहे.