आ.अभय पाटील यांच्याकडून, बंगलोर येथे,एल अँड टीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना खडसावणी

आ.अभय पाटील यांच्याकडून, बंगलोर येथे,एल अँड टीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना खडसावणी

बेळगाव

शहरातील पाणीपुरवठ्याची समस्या निवारण करण्यासाठी नवीन पाईपलाईन घालण्याचे काम सुरू आहे. मात्र पाईपलाईन घालण्यासाठी एल अँड टी अधिकाऱ्यांकडून सहकार्य न मिळाल्यामुळे समस्या निर्माण झाली आहे.अधिकारी योग्य प्रतिसाद देत नसल्यामुळे कामे जलदगतीने पूर्ण होत नसल्याचे आक्षेप त्यांनी व्यक्त केले.

बंगळूर येथे बैठक:१५ एप्रिलपर्यंत मुदत

यावर तोडगा काढण्यासाठी शुक्रवारी बंगळूर येथे नगर विकास खाते व एलॲन्डटी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलविण्यात आली होती.आ.अभय पाटील यांनी या बैठकीत एल अँड टी च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना फैलावर घेतले आणि बेळगाव दक्षिण मतदारसंघात नवीन पाईपलाईन टाकण्यासोबत इतरही कामे त्वरीत हाती घेण्यात यावी असे खडसावले. एवढच नव्हे तर १५ एप्रिलपर्यंत ही कामे पूर्ण करून त्यानंतर दर ४ दिवसांनी पाणीपुरवठा करावा, अश्या सूचना त्यांनी दिल्या. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी देखील त्यास सहमती दर्शवली.

25 टँकरने पाणीपुरवठा आणि 62 बोरवेलच्या:

आ.अभय पाटील यांनी तोपर्यंत लोकांना त्रास होऊ नये म्हणून रोज 25 टँकरने पाणीपुरवठा करण्याची सोय केली  आहे आणि आमदार निधीतून, मंगळवारी 21 मार्चला, बेळगांव दक्षिण मतदारसंघात विविध ठिकाणी 62 बोरवेलच्या कामांना चालना दिली आहे.

 

 

 

.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous post शिवाजी उद्यानातील ॲक्युप्रेशर ट्रीटमेंट पाथचे लोकांकडून उत्तम प्रतिसाद : आ.अभय पाटील यांचा कौतुक.
Next post आ.अभय पाटील यांच्या प्रयत्नाने मच्चे व पूरणवाडी पुन्हा ग्रॅमपंचायत म्हणून घोषित होणार.