शिवाजी उद्यानातील ॲक्युप्रेशर ट्रीटमेंट पाथचे लोकांकडून उत्तम प्रतिसाद : आ.अभय पाटील यांचा कौतुक.
बेळगाव:
बेळगाव शहरातील रहिवाशांना आतापासून छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात फिरायला जाताना एक नवीन अनुभव मिळेल. गुढीपाडव्याच्या शुभमहूर्तावर शिवाजी उद्यानात सुधारित सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आमदार अभय पाटील यांनी आपल्या आमदार निधीतून ‘अॅक्युप्रेशर’ थीमवर आधारित ट्रीटमेंट पाथचे उद्घाटन केले. अॅक्युप्रेशर रक्ताभिसरणावर कार्य करते आणि शरीराला ताजेतवाने करते. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील असल्याचं ट्रॅकवरून रोज व्यायाम करतात.
अॅक्युप्रेशर हे, ‘पंचतत्व’, या निसर्गाच्या पाच घटकांवर आधारित आहे.पृथ्वी, पाणी, वायु, अग्नि आणि आकाश.अॅक्युप्रेशर’ ट्रीटमेंट पाथ मध्ये या घटकांचे प्रतिनिधित्व केले आहे. पंचतत्व वॉक हा एक वर्तुळाकार ट्रॅक असून तो 7 प्रकारचा पथांनी बनलेला आहे. घटकांमध्ये मग्नेटिक पाथ ग्रॉस पाथ,एक्यूप्रेशर पाथ , सी संड पाथ , क्रिस्टल पाथ, हायड्रो पाथ , आणि मड पाथ यांचा समावेश आहे. यामध्ये वॉकरला अनवाणी चालावे लागते.
या ट्रॅकवर चालल्यानंतर वॉकरना ताजेतवाने वाटेल, “गुडघे आणि सांधेदुखी यांसारख्या वयोमानाशी संबंधितअॅक्युप्रेशर समस्यांमुळे लांब अंतर चालू शकत नसलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी हे अधिक फायदेशीर ठरेल,”
काही नागरिकांना विचारले असता त्यांनी ह्या प्रकल्पाचे कौतुक केले आणि आ.अभय पाटील यांचे आभार मानले.