पिरनवाडी चेकपोस्ट : २.८९ लाखांची रोकड जप्त

पिरनवाडी चेकपोस्ट : २.८९ लाखांची रोकड जप्त

बेळगाव : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने दिलेल्या सप्तसूचनेनुसार प्रशासनाने बेकायदेशीर अवैध कारवाईन विरोधात धडक मोहीम चालविली आहे. या मोहिमेअंतर्गत येथील पिरनवाडी चेकपोस्टवर भरारी पथकाने आज बुधवारी 2.89 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.चेकपोस्टवरून जाणाऱ्या इंडिका वाहनाला पोलिस आणि एफएसटीने अडवले. यावेळी पथकातील अधिकाऱ्यांनी वाहनाची तपासणी केली असता 2.89 लाख रुपयांची रोख रक्कम सापडली. जप्त करण्यात आलेली रोकड तिजोरीत जमा होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous post आ.अभय पाटील अनगोळ येथील गरीब महिलेच्या मदतीला धावले..
Next post कांगली गल्लीत शॉर्टसर्किटमुळे घराला आग