आ.अभय पाटील अनगोळ येथील गरीब महिलेच्या मदतीला धावले….
बेळगाव: अनगोळ, झेरे गल्ली येथील घराला आग लागून घरातील गृहोपयोगी आणि खाद्योपयोगी ऐवज जळून खाक झाले. रोजंदारी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारी एका गरीब महिलेच्या घराला शॉर्ट सर्किटमुळे आग लागून आगीत गृहोपयोगी आणि खाद्योपयोगी वस्तू जळून खाक झाल्याने ही महिला मोठ्या अडचणीत आली आहे.
घटनेची माहिती समजताच बेळगाव दक्षिणेचे आ.अभय पाटील यांनी घटनास्थळी त्वरित धाव घेऊन पाहणी केली व घर जळालेल्या त्या महिलेची विचारपूस करून तिला सर्वोत्तोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.
आ.अभय पाटील यांच्या या कार्यतत्परतेने त्या महिलेला खरोखरच एक आधार मिळाल्याचे जाणवले. जणू पाठीराखे भाऊच संकटसमयी धावून आले असे वाटते असे ती महिला यावेळी बोलून गेली.अभय पाटील यांनी यावेळी त्वरित तहसीलदार व संबंधित उपायुक्तांना ही माहिती कळवून घटनास्थळी बोलाविले व घटनेचा पंचनामा करून 15 दिवसात त्या महिलेला मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.