आंदोलन करून परतत
असताना झालेल्या अपघातात
विद्यार्थिनीचा मृत
बेळगाव : गावात बसची व्यवस्था करावी या मागणीसाठी
आंदोलन करून घरी जात असताना झालेल्या अपघातात
एका विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाला तर अन्य दोघी
गंभीर जखमी झाल्या. आठवीच्या वर्गात अक्षता हुलीकट्टी
(१४) हि शिकत होती.
कित्तूर तालुक्यातील निच्छनीके गावाजवळ हा अपघात
घडला.
गावात बस वेळेवर येत नसल्याने आज आंदोलन करण्यात
आले होते. यात अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
आंदोलनानंतर घराकडे पायी जात असताना तीन
विद्यार्थिनींना कारने धडक दिली. यातच अक्षता हिचा
जागीच मृत्यू झाला. अन्य दोघे गंभीर जखमी झाले असून
त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.