स्वामी समर्थ पादुकांचे पालखीचे आगमन जल्लोषात
बेळगाव : प्रतिनिधी
कडोलकर गल्ली येथील श्री स्वामी समर्थ भक्तमंडळ यांच्या वतीने सोमवारी सकाळी श्री स्वामीसमर्थ पादुकांचे स्वागत मोठ्या उत्साहात करण्यात आले.
सोमवारी संयुक्त महाराष्ट्र चौकात सकाळी 10 वाजता पालखीचे स्वागत करून मिरवणुकीला प्रारंभ झाला.
मिरवणुकीमध्ये अदृशानंद भजनी मंडळ काकती आणि भक्ती संस्कृती महिला मंडळ बापट गल्ली यांचे भजन सुरू होते.
खडेबाजार, बापट गल्ली मार्गाने कार पार्किंग पर्यंत ही पादुकांची मिरवणूक संपन्न झाली.
यावेळी श्री स्वामी समर्थ कडोलकर गल्ली भक्तीमंडळचे प्रमुख राजेंद्र गायकवाड, श्रीकांत सांबरेकर, सागर हुंदरे, राजू पवार, संजय नाईक, चेतन शिंदे, वैभव मुचंडी, सुधीर घोडगे, लोकेश राजपूत, जितेंद्र राजपूत, सतीश हावळ, इराण्णा लाली, प्रवीण चौगले, माजी नगरसेविका माया कडोलकर आणि भक्तमंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.