आ.अभय पाटील यांचा बेळगाव जिल्ह्याचा औद्योगिक विकासासाठी विधानसभेत लढा.
बेळगाव:
आज विधानसभेत, बेळगाव दक्षिणचे आ. अभय पाटील यांनी, बेळगावच्या औद्योगिक विकासाचा मुद्दा मांडला. सरकार बियाँड बेंगळूर म्हणते, पण बियाँड हुबळीच्या पुढे, बेळगाव आहे हे बहुतेक सरकारला विसर पडलेला दिसते. नवे उद्योग नाहीच तर असलेल्या उद्योगांनाही सुविधा सरकार पुरवत नाही.
महाराष्ट्र कडून कागल, कोल्हापूर औद्योगिक वसाहतीत अधिक सुविधा पुरण्यात येत आहेत. त्यामुळे येथील असलेले उद्योग तिकडे स्थलांतरित होण्याच्या विचार करत आहेत.
स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध होणे कठीण झाले आहे. अशी वस्तुस्थिती त्यांनी मांडली. येथे येऊन केवळ आश्वासन देऊन गेल्याने काही होणार नाही.बेळगावात उद्योगांना पूरक वातावरण निर्माण करा.
असलेले उद्योग टिकले पाहिजेत तसेच नवे उद्योगही आले पाहिजेत.नव्या आणि असलेल्या उद्योगांना सुविधा-सवलती देण्यासाठी धोरण निश्चित करण्याची मागणी आ. अभय पाटील यांनी केली.
आ. अभय पाटील यांच्या प्रश्नाला उत्तर देताना, मंत्री निराणी म्हणाले बेळगाव जिल्ह्याचा औद्योगिक विकास करण्यासाठी सरकार बांदील आहे, बेळगावात इलेक्ट्रिक वाहन निर्मितीचा रशियन कंपनीचा प्रकल्प आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत अशी माहिती बृहत व मध्यम उद्योगमंत्री मुरगेश निराणी यांनी विधानसभेत दिली.
ते पुढे म्हणाले, बेंगळूरमध्ये एका रशियन इलेक्ट्रिक वाहन निर्मिती कंपनीने आपला प्रकल्प सुरु करण्याची इच्छा दर्शवली होती. पण आम्ही त्यांना बेळगाव, हुबळी-धारवाड किंवा कलबुर्गी येथे प्रकल्प सुरु केल्यास अधिक सुविधा देण्याची तयारी दर्शवली.
खासकरून बेळगावात हा प्रकल्प आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. 2000 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणुकीचा हा प्रकल्प आहे. तो बेळगावात सुरु करण्यासाठी प्रयत्न आहे.
त्याचप्रमाणे बेळगाव हे, फौंड्री उद्योगासाठी प्रसिद्ध असल्याने या उद्योगाच्या विकासासाठी तसेच नवे उद्योग सुरु करण्यासंदर्भात आ. अभय पाटील यांच्याशी चर्चा करून सरकार पावले उचलेल असे आश्वासन मंत्री निराणी यांनी दिले.