मराठा मंडळ अध्यक्षपदी राजश्री नागराजु (हलगेकर) यांची फेरनिवड
बेळगाव;
मराठा मंडळाच्या नुतन कार्यकारी समितीची बैठक आज सायंकाळी श्री. नागेशराव एस. झंगचे यांच्या अध्यक्षतेखाली होऊन सौ. राजश्री नागराजु (हलगेकर) यांची अध्यक्षा म्हणून तर उपाध्यक्षपदी विनायक बसवंतराव घसारी यांची एकमताने निवड झाली.
सौ. राजश्री नागराज यांनी गेली 18 वर्षे अध्यक्षपदाचा कार्यभार सांभाळला असून त्यानी संस्थेमध्ये पदव्युत्तर शिक्षणाची सुरुवात केली संस्थेच्या शाळा कॉलेजीसच्या इमारतींचा कायापालट करून अत्याधुनिक सुविधा विद्याथ्यांकरीता उपलब्ध करून दिल्या त्यांनी यापुढेही असेच कार्य करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी त्यांची अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली आहे.
विनायक घसारी हे गेली बरीच वर्षे कार्यकारी समितीवर सक्रीयपणे कार्य करीत आहेत यांच्या अनुभवाचा संस्थेस बराच लाभ होत आहे. त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी त्यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
मराठा मंडळाची 92 वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. मराठा मंडळ, बेळगांव या संस्थेची 92वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज रविवार दि. 10 सप्टेंबर 2023 रोजी दु. 3-15 वा. मराठा मंडळाच्या सभागृहात संस्थेच्या अध्यक्षा सौ. राजश्री नागराजु (हलगेकर) यांच्या अध्यक्षतेखाली अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
प्रारंभी अध्यक्षानी उपस्थित सभासदांचे स्वागत करून मंडळाने केलेल्या कार्याचा आढावा घेतला व यावर्षी दिवंगत झालेल्या तहात सभासद यांच्या स्मृतीस अभिवादन करून श्रद्धांजली वाहिली. मंडळाच्या सेक्रेटरीनी मागील वर्षाच्या सर्वसाधारण सभेचा इतिवृत्तांत वाचून दाखविला यास सभेने
एकमताने मंजूरी दिली. मराठा मंडळ, मराठा मंडळ विश्वस्त समिती व मंडळाच्या सर्व शैक्षणिक संस्थाच्या 2022-23च्या अहवालास व लेखापरिक्षीत जमाखर्चास तसेच 2023-24 च्या अंदाजपत्रकास सभेने एकमताने मंजूरी दिली