मच्छे येथे पाण्याच्या बादलीत पडून बालकाचा मृत्यू.
बेळगाव :
पाण्याने भरलेल्या बादलीत पडल्याने दीड वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नेहरुनगर, मच्छे येथे मंगळवारी घडली. या घटनेमुळे या परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेची नोंद बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात करण्यात आली आहे.
अनिक विष्णूवर्धन शिंगे (वय दीड वर्ष ) असे त्या दुर्दैवी बालकाचे नाव आहे. अनिक हा खेळत होता.
बादलीमध्ये असलेल्या पाण्याबरोबर मस्ती करत असताना अचानक त्याचा तोल जाऊन. तो बादलीत पडला. त्यामुळे त्याचा त्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. काही वेळानंतर घरातील लोकांच्या नजरेला हा प्रकार आला. त्यानंतर तातडीने त्याला सिव्हिल हॉस्पिटलकडे हलविण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. या घटनेमुळे कुटुंबियांनी एकच आक्रोश केला. दीड वर्षाच्या मुलाचा खेळताना अशा प्रकारे मृत्यू झाल्याने सर्वजण गहिवरले. चिमुकल्याचा मृतदेह पाहून अनेकांना अश्रू अनावर झाले होते.