नगरसेवक नितीन जाधव यांच्य प्रस्तावाचा मनपा कडून दखल.
बेळगाव:
बेळगाव महानगरपालिकेत एकच काउंटर असल्याने जन्म दाखला किंवा मृत्यूचा दाखला मिळविण्यासाठी बेळगावातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता.
परिस्थितीची पाहणी करून नगरसेवक नितीन जाधव यांनी आमदार अभय पाटील यांच्याशी चर्चा करून तोडगा सुचवला आहे. बेळगाव महानगरपालिकेच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत नगरसेवक नितीन जाधव यांनी जन्म-मृत्यू प्रमाणपत्र देण्याची आउटलेट झोनल वाइज उघडण्याचा प्रस्ताव मांडला ज्यासाठी तरतूद आहे.
महापालिकेचे आयुक्त आणि महापौरांनी हा प्रस्ताव स्वीकारला आणि नुकतेच त्याना पत्र पाठवून सरकारला मंजुरीसाठी पाठवले जाईल असे उत्तर दिले.