आ.अभय पाटील यांच्या हस्ते मच्छे येथे उद्या 220 केव्हीचा वीज प्रकल्पाचे उद्घाटन.
बेळगाव:
आ.अभय पाटील यांनी बेळगाव दक्षिण मतदारसंघांतील, मच्छे येथे 220 केव्हीचा वीज प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव सादर केला होता. माननीय ऊर्जा मंत्री श्री सुनीलकुमार यांनी या प्रकल्पाला मंजुरी दिली होती. निवडणूक आचारसंहितेमुळे काम सुरू झाले न्हवते. पण आता उद्या सोमवारी दि.: ०७-०८-२०२३ दुपारी ४:३० वाजता सदर कामाचा शुभारंभ आ.अभय पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे .
मच्छे रहिवासी या बद्दल आमदार अभय पाटील व श्री.सुनीलकुमार यांचे अभिनंदन आणि आभार मानले.