बेळगाव:
कंग्राळगल्लीतील ज्येष्ठ नागरिक व सरपंच म्हणून काम करीत असलेले अनंतराव धाकलू जाधव यांचे रात्री 2=30वाजता दुःखद निधन झाले. त्यांचे वय सुमारे 87 वर्षांचे होते .गेल्या 40वर्षाहून अधिक काळ ते गल्लीतील पंचमंडळात कार्यरत होते. शिवजयंती उत्सव, गणेशोत्सव, गल्लीचे सर्व धार्मिक विधी, महाप्रसाद अशा कार्यक्रमात त्यांचा मोठा सहभाग होता. वेताळ देवस्थान ,छत्रपती शिवाजी महाराज सभागृहाचे कामकाज ते पहात होते. गल्लीतील पंचमंडळ सल्लागार व नागरिक यांच्याबरोबर गल्लीच्या प्रश्नाबाबत ते सतत चर्चा करीत असत.गल्लीचे पंचमंडळ, सल्लागार समितीचे सदस्य, नागरिक, युवक, कार्यकर्ते, महिला मंडळ च्या वतीने अनंत राव जाधव यांना भावपूर्ण श्रद्धांजली. परमेश्वर त्यांच्या आत्म्याला चिरशांती देवो हीच प्रार्थना. त्यांच्या पश्यात पत्नी, तीन पुत्र, एक कन्या सूना नातवंडे असा परीवार आहे.
अंतयात्रा आज सकाळी 11.00 वाजता कंग्राळ गल्लीतून निघून सदाशिव नगर स्मशानभूमी येथे अंत्यविधी होणार आहे