पौरकार्मिक संतोष हुवानावर यांना ध्वजारोहणाचा मान देवून ग्रामपंचायत अध्यक्षा सौ लक्ष्मी भारत मासेकर यांनी समाजापुढे एक आदर्श ठेवला आहे.
येळळुर :
येळळुर ग्रामपंचायत मध्ये 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी येळळुर ग्रामपंचायतीमध्ये स्वच्छता कामगार म्हणून कार्यरत असणारे संतोष हुवानावर यांना ग्रामपंचायत अध्यक्षा सौ लक्ष्मी भारत मासेकर यांनी ध्वजारोहण करण्याचा मान दिला.
त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. प्रथमता ग्रामपंचायत अध्यक्षा सौ लक्ष्मी भरत मासेकर व उपाध्यक्ष प्रमोद पाटील यांच्या हस्ते सुभाषचंद्र बोस व महात्मा गांधीजी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत विकास अधिकारी पूनम गडगे सेक्रेटरी सदानंद मराठे . ग्रामपंचायत चे सर्व सदस्य .ग्रामपंचायत कर्मचारी. तलाठी मयूर मासेकर. अंगणवाडी टीचर .आशा वर्कर .व शिवाजी विद्यालयाचे विद्यार्थी व शिक्षक. कर्नाटक दलित संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.