सीबीएसई द. विभागीय जलतरणात सुयश.

सीबीएसई द. विभागीय जलतरणात सुयश.

बेळगाव :

पी.एस.एस.ई.ई.एम.आर. शाळा, दावणगेरे येथे गेल्या 8 ते 12 सप्टेंबर 2024 या कालावधीत संपन्न झालेल्या सीबीएसई दक्षिण विभाग II स्पर्धा -2024 मध्ये निधी कुलकर्णी (केएलएस पब्लिक स्कूल), तन्वी पै (केएलई इंटरनॅशनल स्कूल) आणि वेदांत मिसाळे (ज्योती सेंट्रल स्कूल) या स्विमर्स क्लब बेळगाव आणि एक्वेरियस स्विम क्लब बेळगावच्या जलातरणपटूंनी स्पृहाणीय यश संपादन करून शहराचा नावलौकिक वाढवला आहे.

सीबीएसई दक्षिण विभागीय जलतरण स्पर्धेत निधी, तन्वी आणि वेदांत यांनी 3 सुवर्ण पदके, 3 रौप्य पदके आणि 1 कांस्य पदक जिंकले. या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्यांची सीबीएसई राष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या जलतरणपटूंनी जिंकलेल्या पदकांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. :- निधी कुलकर्णी -50 मी. बटरफ्लाय स्ट्रोक सुवर्ण पदक, 200 मी. बटरफ्लाय स्ट्रोक सुवर्ण पदक, 100 मी. बटरफ्लाय स्ट्रोक रौप्य पदक. तन्वी पै -50 मी. ब्रेस्ट स्ट्रोक सुवर्ण पदक. वेदांत मिसाळे -100 मी. बटरफ्लाय स्ट्रोक रौप्य पदक, 200 मी. बटरफ्लाय स्ट्रोक रौप्य पदक, 50 मी. बटरफ्लाय स्ट्रोक कांस्य पदक.

हे तीनही जलतरणपटू सुवर्ण जेएनएमसी जलतरण तलाव (ऑलिम्पिक आकार) बेळगाव येथे उमेश कलघटगी, अक्षय शेरेगर, अजिंक्य मेंडके, नितीश कुडूचकर, गोवर्धन काकतकर, इम्रान उचगावकर व विनायक आंबेवाडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोहण्याचे प्रशिक्षण घेत आहेत. तसेच या सर्वांना डॉ. प्रभाकर कोरे (चेअरमन केएलई सोसायटी), जयंत हुंबरवाडी (अध्यक्ष, जयभारत फाउंडेशन), रो. अविनाश पोतदार, श्रीमती मानेक कपाडिया, श्रीमती लता कित्तूर, सुधीर कुसाणे, प्रसाद तेंडोलकर आदींचे प्रोत्साहन लाभत आहे. विभागीय स्पर्धेतील यशाबद्दल उपरोक्त तीनही जलतरणपटूंचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous post गणेश विसर्जनाच्या वेळी चाकू हल्ला ….तीन युवक जख्मी.
Next post भारत विकास परिषदेच्या “भारत को जानो” प्रश्नमंजुषा स्पर्धा अपूर्व उत्साहात संपन्न