भारत विकास परिषदेच्या “भारत को जानो”
प्रश्नमंजुषा स्पर्धा अपूर्व उत्साहात संपन्न
बेळगाव /
भारत विकास परिषदेवतीने आंतरशालेय “भारत को जानो” प्रश्नमंजुषा स्पर्धा जीजीसी सभागृहात अपूर्व उत्साहात पार पडली. प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य व्ही. एन्. जोशी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते भारतमाता व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात संगीता तिगडी- नाडगीर यांच्या संपूर्ण वंदे मातरम् गायनाने झाली. भारत विकास परिषदेचे अध्यक्ष विनायक मोरे यांनी स्वागत व प्रास्ताविक भाषण केले. पांडुरंग नायक यांनी भारत विकास परिषदेच्या राष्ट्रीय प्रकल्पांची तसेच कार्याची माहिती दिली. डॉ. व्ही. बी. यलबुर्गी यांनी “भारत को जानो” स्पर्धेविषयी विस्तृत विवेचन केले. प्रा. अरुणा नाईक यांनी स्पर्धेचे नियम व अटी समजावून दिल्या. त्याचप्रमाणे स्पर्धेचे महत्त्व अधोरेखित केले. स्पर्धा संयोजक डॉ. जे. जी. नाईक यांनी प्रश्नमंजुषा स्पर्धेचे उत्कृष्ट संचालन केले. सुहास गुर्जर आणि सुभाष मिराशी यांनी स्कोअरर म्हणून चोख कामगिरी बजावली.
स्पर्धेत प्रथम क्रमांक संत मीरा मराठी माध्यम स्कूल गणेशपूर, द्वितीय क्रमांक अमृता विद्यालय, तृतीय क्रमांक बालिका आदर्श विद्यालयाने मिळविला. विशेष पारितोषिक के. एल. एस. स्कूल आणि बी. के. मॉडेल स्कूल यांना देण्यात आले. प्रथम क्रमांक प्राप्त संघाची 22 सप्टेंबर रोजी गंगावती येथे होणाऱ्या प्रांतस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.
कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन स्वाती घोडेकर यांनी केले. सेक्रेटरी के. व्ही. प्रभू यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमास नामजी देशपांडे, विनायक घोडेकर, सुहास सांगलीकर, रामचंद्र तिगडी, व्ही. आर. गुडी, कॅप्टन प्राणेश कुलकर्णी, डी. वाय. पाटील, पी. एम. पाटील, चंद्रशेखर इटी, विजय हिडदुग्गी, डॉ. जनार्दन नाईक, गणपती भुजगुरव, लक्ष्मी तिगडी, उमा यलबुर्गी, जया नायक, शुभांगी मिराशी, विद्या इटी, प्रिया पाटील, ज्योती प्रभू, अक्षता मोरे, ज्योत्स्ना गिलबिले, भारत विकास परिषदेचे सर्व सदस्य, शिक्षकवर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.