बेळगाव दक्षिण मतदार क्षेत्रासाठी भाजपच्या उमेदवारीसाठी माजी मंत्री रमेश जरकिहोळी यांचा षडयंत्र…?
बेळगाव : माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांनी आपले
समर्थक आणि विधानसभेसाठी भाजपच्या उमेदवारीसाठी
इच्छुक असलेल्या दोन्ही उमेदवारांना घेऊन नागपूरवारी
केलेली आहे. बेळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून
भाजप उमेदवारीसाठी इच्छुक असलेले मराठा समाजातील
हिंडलगा ग्राम पंचायत अध्यक्ष नागेश मन्नोळकर
त्याचप्रमाणे दक्षिण मतदारसंघातून इच्छुक असलेले किरण
जाधव यांना घेऊन माजी मंत्री व गोकाकचे आमदार रमेश
जारकीहोळी यांनी नागपूरचा दौरा केला आहे.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी या दोन्ही इच्छुक
मराठा चेहऱ्यांना उमेदवारी देण्याची मागणी केली. ग्रामीण
आणि दक्षिण मतदार संघात मराठा समाज मोठ्या संख्येने
आहे. यासाठी दोन्ही मतदार संघात दोन्ही उमेदवारी
मिळावी, अशी मागणी यावेळी केली. भाजपच्या केंद्रीय
संसदीय समितीत देवेंद्र फडणवीस यांचा समावेश आहे
यासाठी त्यांना या दोघा इच्छुक उमेदवारांच्या तिकिटासाठी
साकडे घालण्यात आले आहे.