आ.अभय पाटील यांच्या संकल्पनेतून भारतातील पहिला अनोखा अंडरग्राऊंड डस्टबिन विथ सेन्सर हैड्रॉलिक ऑपरेटेड वेहीकल प्रकल्पचे उद्घाटन.
बेळगांव:
देशातील पहिल्या सेन्सर युक्त , हायड्रॉलिक चालीत,अंडर ग्राउंड डस्टबिनचे ,आ. अभय पाटील यांच्याहस्ते शुक्रवारी बेळगावात उदघाटन करण्यात आले. बेळगाव शहराचा स्मार्टसिटी योजनेत समावेश झाल्यापासून केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त निधीतून अनेक विकासकामे राबविण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे विकास केंद्रीभूत मानून चालणाऱ्या बेळगाव दक्षिणचे आ. अभय पाटील यांच्या संकल्पनेतून अनेक नवनवीन योजना राबविण्यात येत आहेत.
त्याचाच एक भाग म्हणून बसवेश्वर सर्कल, गोवावेस येथे शहरातील पहिल्या सेन्सर युक्त , हायड्रॉलिक चालीत अंडर ग्राउंड डस्टबिनचे आ. अभय पाटील यांच्याहस्ते उदघाटन करण्यात आले. याठिकाणी फुटपाथलगत चौकोनी आकारात झाकण असलेले कचराकुंड बसवण्यात आले आहे. कचऱ्याने भरलेले कुंड क्रेनच्या सहाय्याने वर ओढून कचरागाडीत ओतण्याची सोय यात आहे. त्याचे प्रात्यक्षिक यावेळी दाखवण्यात आले.
या प्रकल्पाचे विशेष बाब म्हणजे , डस्टबिन खाली केल्यानंतर त्याला पाण्यानी स्वच्छ कार्याची सोई त्या गाडीतच दिलेला आहे. आणि ह्या डस्टबिन मध्ये तीन प्रकारचे सेन्सर ॲक्टिविटी आहेत.पहिली 70 %कचरा भरल्यानी स्थानीक नगर सेवक आणि ड्रायव्हरला सिग्नल जातो, दूसरा 80%भरल्याणी, स्थानीक नगरसेवक,ड्रायव्हर आणि ए. डब्लू ल सिग्नल जाते.तिसरा टप्पा म्हणजे 90% भरल्याने नगरसेवक,ड्रायव्हर ,ए. डब्लू आणि कमिशनरला जाते…. माग तरी कचरा उच्छल ल नाही तर कार्यवाही केली जाईल.
महापालिका अधिकाऱ्यांनी आ. अभय पाटील यांना या प्रकल्पाची तांत्रिक माहिती दिली. यासंदर्भात प्रसारमाध्यमांना माहिती देताना आ. अभय पाटील म्हणाले, संपूर्ण भारतातीलच हा पहिला अनोखा अंडरग्राऊंड डस्टबिन विथ सेन्सर हैड्रॉलिक ऑपरेटेड वेहीकल प्रकल्प आहे, असे त्यांनी सांगितले.