गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी शहरातील जुने विजेचा खांब काढला!

गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी शहरातील जुने विजेचा खांब काढला!

बेळगाव :

श्री गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहरातील धर्मवीर संभाजी चौकातील रहदारीस अडथळे ठरणारे जुने विद्युत खांब त्याचप्रमाणे किर्लोस्कर रोडवरील एकूण सहा खांब सोमवारी हेस्कॉमकडून हटविण्यात आले.

स्कॉम अधिकाऱ्यांनी आज स्वतः संभाजी चौकात उपस्थित राहून जेसीबीच्या सहाय्याने केळकर बाग कॉर्नर वरील जुना विद्युत खांब तसेच या ठिकाणी रदारीस अडथळा ठरणारे अन्य खांब देखील हटविण्यात आले.

गणेश विसर्जन मिरवणुकीचा धर्मवीर संभाजी चौक किर्लोस्कर रोड हा मुख्य मार्ग असल्यामुळे केळकर बाग येथील कॉर्नरवरील खांब मिरवणुकीस अडथळा ठरणार होता. सदर खांब हटविण्यात यावा यासाठी मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी मागील महिनाभरापासून पाठपुरावा सुरू ठेवला होता याची दखल घेत हेस्कॉमने आज सकाळी सदर खांब जेसीबीच्या सहाय्याने दोरखंड बांधून हा खांब हटविण्यात आला त्यावेळी थोड्या वेळासाठी विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता आणि काही काळासाठी ट्राफिक जाम झाला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous post जक्केरी होंडा गणेश विसर्जनासाठी सज्ज.
Next post गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पोलीस प्रशासन सज्ज