पोलीस आयुक्तांची भेट घेतली शिवजयंती चित्ररथ महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी.
बेळगाव:
बेळगाव शहरात पोलिस आयुक्त पदी एस. एन. सिद्धरामप्पा नुकतीच कर्तव्य दक्ष अधिकारी म्हणून लौकिक असलेले सिद्धरामय्या यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे शिवजयंती चित्ररथ महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच भेट घेतली.
रोहित रावळ यांनी शहरातील व्यवसायिकांना भेडसावणाऱ्या रहदारी समस्या सोडविण्यासाठी त्याचप्रमाणे रस्तावरील अतिक्रमण हटवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. काही समस्या असल्यास थेट पोलीस आयुक्तालयाशी संपर्क साधण्याचे सांगितले. पोलिसांकडून सर्वोत्तोपरी सहकार्य लाभेल, असेही पोलीस आयुक्त सिद्धरामय्या यांनी आश्वासित केले.
या भेटीत सरचिटणीस जे बी शहपुरकर संजय नाईक रोहित रावळ अरुण पाटील सोमनाथ खांनगावकर, बसवंत मूतकेकर शिवजयंती महामंडळाचे अध्यक्ष सुनील जाधव यांनी पोलीस आयुक्तांची विविध विषयांवर चर्चा करून त्यांना पुढील कारकीर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.