मोहरमच्या पाश्वर्भूमीवर पोलीस स्थानकात बैठक
बेळगाव:
इस्लामिक कॅलेंडरच्या पहिल्या महिन्याची म्हणजेच नव्या वर्षाची सुरुवात मोहरम महिन्यापासून केली जाते. यंदा २९ जुलै रोजी होणाऱ्या मोहरम ताजियाची सुरुवात १९ जुलै पासून होणार आहे. या पार्श्वभूमीवर बेळगावमधील मुस्लिम समाजाच्या प्रमुख नेत्यांची तसेच शांतता समितीच्या सदस्यांची बैठक खडेबाजार पोलीस स्थानकात बोलाविण्यात आली होती. या बैठकीत मोहरम उत्सवाच्या तयारीसंदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी पोलीस निरीक्षक दिलीप निंबाळकर, पीएसआय सौदागर, ए. के. धारवाडकर, प्रवीण तेजम, विकास कलघटगी, मोहन कारेकर, माजी महापौर मालोजी अष्टेकर, ए. आय. कटांबले, देवेंद्र कांबळे, भाऊ किल्लेकर, गजानन शहापूरकर, संदीप चौगुले, समीउल्ला पठाण, मोहम्मद साबीर शेख, अलिसाब मुजावर, राहुल जाधव, हाजीअली नूरानी आदी उपस्थित होते.