प्रतिभावंत अभिनेते रविंद्र महाजनी यांचे निधन 

प्रतिभावंत अभिनेते रविंद्र महाजनी यांचे निधन

पुणे :

प्रतिभावंत अभिनेते रविंद्र महाजनी यांचा मृत्यू झाला आहे. 77 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुण्यातील तळेगाव-दाभाडे येथील त्यांच्या राहत्या घरात त्यांचा मृतदेह आढळून आला. रविंद्र महाजनी हे गेल्या काही दिवसांपासून तळेगाव दाभाडे येथे राहत होते. रविंद्र महाजनी यांच्या जाण्यानं मराठी चित्रपट सृष्टीतून हळहळ व्यक्त होत आहे.

शुक्रवारी शेजाऱ्यांनी रविंद्र महाजनी राहत असलेल्या घरातून दुर्गंधी येत असल्याची माहिती तळेगाव पोलिसांना दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत, रविंद्र महाजनी राहत असलेल्या घराचा दरवाजा तोडला. त्यावेळी पोलिसांना रविंद्र महाजनी यांच्या मृतदेह आढळून आला. दरम्यान, दोन ते तीन दिवसांपूर्वीच मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलीस तपासात व्यक्त केला जात आहे.

रविंद्र महाजनी यांचा मुलगा अभिनेता गश्मिर महाजनी मुंबईत राहतो. पोलिसांनी त्याला सर्व माहिती दिली असून तो तात्काळ पुण्यात दाखल झाला. रविंद्र महाजनी यांचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह त्यांचा मुलगा गश्मिर महाजनीकडे सोपवण्यात येणार आहे. शनिवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील, अशी माहिती मिळत आहे.

 

बैल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous post आ.अभय पाटील यांच्या कडून मच्छे नगरपंचायतीच्या स्वच्छतेसाठी चार वाहनांची सुविधा
Next post गृह लक्ष्मी योजनेसाठी अर्ज सादर करणे 19 जुलैपासून