नगरसेविका नेत्रावती विनोद भागवत यांच्या कडून वार्ड नं.15 मध्ये टॅंकरने पाणी पुरवठा

नगरसेविका नेत्रावती विनोद भागवत यांच्या कडून वार्ड नं.15 मध्ये टॅंकरने पाणी पुरवठा

 

बेळगाव :

शहरवासियांना सुरळीत पाणीपुरवठा होत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. काही भागात आठ ते पंधरा दिवस पाणीपुरवठा होत नसल्याने पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.

वार्ड क्र.15 मधील मल्लिकार्जुन नगर आणि समर्थ नगर येथील नागरिकांच्या मागणीनुसार नगरसेविका सौ.नेत्रावती विनोद भागवत यांनी आ.अभय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ,तातडीने या भागात आज टँकरने पाणी पुरवठा केला आणि यावेळी नगरसेविकेने पाण्याचा वापर जपून करण्याची विनंती नागरिकांना केली.

तसेच राकसकोप जलाशयाच्या पाणीपातळीत घट होत आहे. पावसाने अशाचप्रकारे हुलकावणी दिल्याने भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. उन्हाच्या झळा वाढल्या असून पाण्याचा वापरही वाढत आहे. सध्या पिण्याच्या पाण्याची कमतरता भासत आहे. विहिरी, कूपनलिकांची पाणीपातळी घटली असल्याने सर्वांना नळाच्या पाण्यावरच विसंबून राहावे लागत आहे.

यावेळी तेथील नागरीकांनी आ.अभय पाटील आणि नगरसेविका सौ.नेत्रावती विनोद भागवत यांचे आभार व्यक्त कॆले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous post वॉर्ड क्र. ५४ मध्ये रहिवासी प्रभाग समिती स्थापन करण्याचा  एकमताने निर्णय.
Next post  जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी पिण्याच्या पाण्यासाठी घेतली टास्क फोर्सची बैठक,