शनिवारी 13 मे रोजी मतमोजणी ,आता लक्ष निकालाकडे
शनिवारी 13 मे रोजी मतमोजणी ,आता लक्ष निकालाकडे
बेळगाव :
कर्नाटक विधानसभेसाठी बुधवारी मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली. आता शनिवारी 13 मे रोजी मतमोजणी होणार आहे.त्या निकालाची उत्सुकता उमेदवारांसह सर्वच मतदारांना लागून राहिली आहे.
टिळकवाडी येथील राणी पार्वती देवी महाविद्यालयात शनिवारी मतमोजणी होणार आहे. मतमोजणीसाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. 828 कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. मायक्रो ऑब्झर्वर म्हणून 360 कर्मचारी असे एकूण 1188 कर्मचारी मतमोजणीसाठी राहणार आहेत.यासह निमलष्करी दल आणि पोलिस बंदोबस्त असणार आहे.