दहावी पुरवणी परीक्षा जूनमध्ये
बेळगाव प्रतिनिधी
दहावी परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला. राज्याचा निकाल 83.89 टक्के लागला आहे. या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी जून महिन्यात पुरवणी परीक्षा होणार आहे. यासाठी परीक्षा मंडळाच्या संकेतस्थळावर नोंदणी करायची आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी फोटो, स्वाक्षरीसह इतर माहिती अपलोड करायची आहे.पूर्वपरीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एका विषयासाठी 370, दोन विषयांसाठी 461, तीन किंवा त्यापेक्षा जास्त विषयांसाठी 620 रुपये शुल्क भरावे लागणार आहे. नोंदणीसाठी 15 मेपर्यंत मुदत आहे. परीक्षा शुल्क दि. 17 ते 18 मे या कालावधीत भरायचे आहे. 25 मेनंतर परीक्षा वेळापत्रक जाहीर होणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावर प्रवेशपत्र उपलब्ध होणार आहे.