बेळगाव:
बेळगाव दक्षिण मधील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अभय पाटील यांच्या प्रचारासाठी उपनगरी भागात झंजावाती प्रचार दौरा सुरू आहे . अभय पाटील यांच्या समर्थनार्थ त्यांच्या पत्नी प्रीती अभय पाटील ,महिला संघ तयार करून प्रचाराच्या रिंगणात उतरल्या आहेत.
गेल्या काही दिवसांपासून ते मतदारसंघातील प्रत्येक प्रभागात प्रचार करत आहेत.तळपत्या उन्हाची पर्वा न करता त्या पदयात्रेच्या माध्यमातून मतदारसंघातील पतीच्या कर्तृत्वाचा प्रचार करत आहेत.
चिदंबर नगर, राणा प्रताप रोड,राणी चन्नमानगर , गुरुप्रसाद कॉलनी, विश्वकर्मा कॉलनी, डिफेंस कॉलनी, कावेरी नगर , पोस्टल कॉलनी येथे व्यापक प्रचार मोहीम राबविण्यात आली यावेळी येथील नागरिकांनी अभय पाटील यांनी केलेल्या विकास कार्याची कौतुक केले आणि त्यांना पुन्हा बहुमताने विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला अभय पाटिल यांच्या पत्नी प्रीती अभय पाटील यांनी या प्रचार मोहिमेत भाग घेतला होता.