बेळगाव:
बेळगाव दक्षिणमधील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अभय पाटील यांनी आपल्या प्रचारासाठी जोरदार मोहीम सुरू केली आहे बुधवारी सकाळी त्यांनी उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य समवेत शहरातील राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करून आपल्या प्रचाराला सुरूवात केले.यामध्ये जगद्गुरु बसवेश्वर ,डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा, धर्मवीर संभाजी चौक येथील धर्मवीर संभाजी महाराजांचा पुतळा , छत्रपती शिवाजी उद्यान येथील शिवाजी महाराजांचा पुतळा संगोळी रायण्णा यांच्या पुतळ्यांना अभिवादन केले. तसेच शहरात विविध ठिकाणी असणाऱ्या राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यांना पूजन आणि अभिवादन करण्यात आले.