भाजपाची 189 उमेदवारांची पहिली यादी जाहीर .

बेळगाव :

कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीसाठी भाजपाने 189 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केलीआहे.

बेळगाव उत्तर मधून रवी पाटील तर बेळगाव दक्षिण मधून पुन्हा एकदा आमदार अभय पाटील यांना संधी देण्यात आली असून प्रचारासाठी त्यांचा मार्ग खुला आहे.

बेळगाव जिल्ह्यातील उमेदवार असे :

गोकाक – रमेश जारकीहोळी

बेळगाव उत्तर – रवी पाटील

बेळगाव दक्षिण – अभय पाटील

बेळगाव ग्रामीण – नागेश मन्नोळकर

अथणी – महेश कुमठळ्ळी

निपाणी – शशिकला जोल्ले

अरभावी – भालचंद्र जारकीहोळी

सौदत्ती – रत्ना मामनी

खानापूर – विठ्ठल हलगेकर

यमकनमर्डी – बसवराज हुंद्री

कुडची – पी. राजीव

चिकोडी – रमेश कत्ती

कागवाड – श्रीमंत पाटील

रामदुर्ग – चिक्क रेवन्ना

बैलहोंगल – जगदीश मेंटगुड

हुक्केरी – निखील कत्ती

मुधोळ – गोविंद कारजोळ

यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. कर्नाटक विधानसभेची निवडणूक तोंडावर असून काँग्रेस पक्षाला वातावरण अनुकूल असल्याचा राजकीय निरीक्षकांचा अंदाज आहे. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेतही त्याचा अनुभव आला होता.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous post गोव्यातील तृणमूल काँग्रेसचे खासदार लुइझिन फालेरो यांचा राजीनामा
Next post भाजपाचे माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांचा राजीनामा