भाजपाचे माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांचा राजीनामा

बेळगाव :

भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी अनेक दिग्गज इच्छुकांना उमेदवारी नाकारल्यानंतर भाजपमध्ये नाराजी सत्र सुरु झाले आहे. याचाच भाग म्हणून माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी भाजपाला रामराम ठोकत आपल्या विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

लक्ष्मण सवदी यांनी अथणी मतदार संघातून तीनवेळा आमदारपद भूषविले आहे. येत्या १० मे रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी त्यांनी भाजपाकडे उमेदवारीसाठी अर्ज दाखल केला होता.

मात्र अथणी मतदार संघात विद्यमान आमदार महेश कुमठळ्ळी यांना उमेदवारी जाहीर केल्याने नाराज झालेल्या लक्ष्मण सवदी यांनी विधान परिषद सदस्यपदाचा आणि भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत गुरुवारी आपण मजबूत निर्णय घेणार असल्याचे पत्रकारपरिषदेत सांगितले आहे.

गेल्या दोन-चार दिवसांपासून अथणी मतदार संघातूनलक्ष्मण सवदी यांच्या उमेदवारीबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous post भाजपाची 189 उमेदवारांची पहिली यादी जाहीर .
Next post शिवजयंती चित्ररथ महामंडळाचे पदाधिकारी जाहीर