सिंगीनकोपच्या कोसळलेल्या शाळा इमारतीकडे शासनाचे दुर्लक्ष
खानापूर (प्रतिनिधी) : अतिवृष्टीमुळे सिंगीनकोप (ता.खानापूर) येथील लोअर प्राथमिक मराठी शाळेच्या इमारतीच्या तीन खोल्या जमिनदोस्त झाल्या. याची पाहणी केंद्रीय पथकासह जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी केली.
यावेळी केंद्रीय जल आयोग, जल उर्जा मंत्रालयाचे संचालक अशोक कुमार व्ही, यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय अभ्यास पथकात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग विभागाचे अधीक्षक अभियंता व्ही व्ही शास्त्री तसेच कर्नाटक राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे वरिष्ठसल्लागार डॉ. जी. एस. श्री. निवास रेड्डी, सीईओ दर्शन,तहसीलदार प्रविण जैन, बीईओ राजेश्री कुडची, तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी राजेश धनवडकर, आदीनी करून वर्ष होत आले. तरीसुद्धा नुतन इमारत उभारण्याकडे शासनाचे साफ दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे विद्यार्थी वर्गाची जागे अभावी खूपच कुचंबणा होत आहे.
सिंगीनकोप (ता. खानापूर) येथील लोअर प्राथमिक मराठी शाळेच्या इमारतीच्या तीन खोल्यांची झालेल्या नुकसानाची माहिती अधिकाऱ्यांनी करून घेतली.