बेळगाव दक्षिणबाबतचा काँग्रेसचा उम्मेद्वार अद्यापही सस्पेन्स
नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने 124 उमेदवारांची पहिली यादी आज शनिवारी सकाळी जाहीर करण्यात आली आहे.पक्षाचे सचीव मुकुल वासनिक यांनी सदर यादी जाहीर केली आहे.
या यादीमध्ये पक्षाचे प्रदेशाध्यक्ष डी के. शिवकुमार हे कनकपुरा मतदारसंघातून तर सिद्धरामय्या वरुणा मतदार संघातून निवडणूक लढवणार आहेत. त्याचबरोबर बेळगाव जिल्ह्यातून बेळगाव ग्रामीण मतदारसंघातून विद्यमान आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, खानापूर मतदारसंघातून विद्यमान आमदार डॉक्टर अंजली निंबाळकर यांना तर यमकनमर्डी मतदार संघातून सतीश जारकीहोळी, कुडची मतदारसंघातून महेंद्र तमन्नावर, चिकोडी मतदारसंघात गणेश हुक्केरी, कागवाड बी. ए. कागे, रामदुर्ग अशोक पट्टण, बैलहोंगल महांतेश कौजलगी, हुक्केरी ए. बी. पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान बेळगाव उत्तर, बेळगाव दक्षिणबाबतचा काँग्रेसचा सस्पेन्स अद्यापही बाकी आहे.