तीन लाखाचा विनापरवाना दारू साठा जप्त
बेळगाव
गोव्याहून हावेरीला विनापरवाना दारूची वाहतूक करणाऱ्या वाहनासह एकूण तीन लाख 19 हजाराचा मद्यसाठा जप्त करण्याची कारवाई अबकारी विभागाने रविवारी सकाळी केली.
जमील निजामुद्दीन शिरहट्टी (वय48) रा. हावेरी तालुका हावनूर असे या कारवाईत अटक करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे. अनमोड चेक पोस्ट नाक्यावर अबकारी विभागाने हे वाहन अडवून झडती घेतली असता यामध्ये नामवंत कंपन्यांच्या दारू बाटल्यांचा अवैध साठा आढळून आला. तो जप्त करण्यात आला. मंगळूर विभागाचे अबकारी सहायुक्त यांच्या आदेशानुसार अबकारी उपायुक्त उत्तर कन्नड जिल्हा यांच्या मार्गदर्शनानुसार ही कारवाई करण्यात आली.