नितीन जाधव यांच्या कडून देशमुख रोड ट्रॅफिक समस्येला तोडगा.

नितीन जाधव यांच्या कडून देशमुख रोड ट्रॅफिक समस्येला तोडगा.

बेळगाव : प्रतिनिधी

बेळगाव शहर आणि परिसरात वाहनांचे पार्किंग ही समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत आहे. त्यामुळे दुचाकी आणि चार चाकी वाहनांचे पार्किंग कोठे करावे? ही समस्या नेहमीच त्रस्त करीत असते. या पार्श्वभूमीवर रहदारी पोलिसांकडून वाहनांचे टोईंग सुरूच आहे. दुचाकी आणि चार चाकी वाहने टोईंग मशीनद्वारे उचलून नेण्याची कामगिरी पोलीस यंत्रणा करताना दिसते आहे. त्यामुळे याचा भुर्दंड वाहन धारकांना सोसावा लागतो आहे.

देशमुख रोड टिळकवाडी येथे गेल्या अनेक वर्षांपासून ट्रॅफिक समस्या होत होती . वॉर्ड क्रमांक 29 मधील नागरीकांना  नगरसेवक नितीन ना. जाधव यांना या समस्येवर तोडगा काढण्याची विनंती केली होती .

त्यांचा विचार करून आमदार अभय पाटील यांच्या मार्गदरशनाखाली,नगरसेवक नितीन जाधव यांनी सौथ ट्रॅफिक सीपीआय विनायक बडिगेर यांना भेटून फस्ट गेट ते आरपीडी कॉरर्नर ह्या  रोड वर विषम दिवस आणि सम दिवस पार्किंग रुल्स करण्याचे विषय मांडले आणि  त्याला सीपीआय विनायक बडिगर ने संमती दिले.

आज दोन ठिकाणी ट्रॅकिक रुल्स चे बोर्ड बसवण्यात आले. नगरसेवक नितीन जाधव यांनी स्वखर्चाने बोर्डाची व्यवस्था केली आहे. नितीन जाधव यांनी सांगितले की हे प्रयोग तत्वावर हे सुरू करण्यात आले आहे. हा प्रयोग यशस्वी झाले की सगळे ठिकाणी लागू करता येइल.त्यांनी नागरिकांना सहकार करण्याची विनंती केली आहे पी. एस. आय.नारायण पटवर्धन आणि सौथ ट्रॅफिक सीपीआय विनायक बडिगेर यांचे आभार मानले.

या उपक्रमाला पी. एस. आय. नारायण पटवर्धन,मल्लिक हरती, संतोष आगारे. महावीर कोल्हापुरे.रणजीत कदम मनोज कोल्हापुरे  आणि इतर प्ररतिष्ठीतनागरिक उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous post KLES डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटल येथे  दुर्मिळ आजार वर यशस्वीरित्या उपचार
Next post लिंगायथ संघटना बेळगावी (LSB ) तर्फे देशभक्ती गाण्यावर आधारीत नृत्य स्पर्धा