अवकाळी पावसामुळे भाग्यनगर परिसरात झाडांची पडझड
बेळगाव : प्रतिनिधी
अवकाळी पावसामुळे शहर आणि परिसरात झाडांची पडझड आणि विद्युत वाहिन्यांचे नुकसान झाले आहे. शनिवारी पहाटे पासून झालेल्या पावसात भाग्यनगर 2रा क्रॉस येथे झाड कोसळून परिसरातील विद्युत वाहिन्यांचे देखील नुकसान झाले आहे. मात्र, यावेळी कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.
अवकाळी पावसाचा जोर दिवसेंदिवस वाढत चाला आहे. वादळ आणि विजेच्या कडकडाटासह होणार्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. शनिवारी सकाळ पासून झालेल्या जोरदार वारा, पावसामुळे ठिकठिकाणी झाडे कोसळून विद्युत वाहिन्यांचे नुकसान झाले आहे.
पहाटे 6,15 च्य दरम्यान झाड कोसळलं आणि तिकडच्या रहिवासी ने नगरसेवक अभिजीत जवळकार यांना सांगितले.अभिजीत जवळकर यांनी त्वरीत हेस्कम् चे अधिकारी वेंकटेश कल्ललिमनी यांना घेवून तिथं पोहचले आणि कनेक्शन तोडले.
त्यानंतर फॉरेस्ट डिपार्टमेंट चे पुरुषोत्तम यांनी घटना स्थळी पोहचून कार्यवाही केले आणि झाडं कापून रस्ते साफ केले.ह्यावेळी नगरसेविका वणी जोशी ही उपस्थित होते.
वादळी पावसाच्या वातावरणामुळे नागरिक घरामध्ये बंदिस्त राहिल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. नागरिकांनी नगरसेवक अभिजीत जवळकर आणि वणी जोशी यांचे आभार मानले.