वॉर्ड क्रमांक 24 भागात पाणी टँकरचे व्यवस्था
बेळगाव : प्रतिनिधी
आ.अभय पाटील यांचा मार्गदर्शनखाली नगरसेवक गिरीश धोंगडी यांचा नेतृत्त्वाखाली वॉर्ड क्रमांक 24 मधील शास्त्रीनगर,मिरपूर गल्ली,कचेरी गल्ली, खडेबाझर शहापूर येथे 10 पाणी टँकरचे व्यवस्था करण्यात आली आहे.
गेल्या महिन्यापासून शहर आणि उपनगरातील परिसरात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. राकसकोप जलाशयात केवळ मे महिन्यापर्यंत पाणीपुरवठा होईल, इतकाच साठा आहे. त्यामुळे लोकांना चिंता लागून आहे. पिण्याबरोबरच वापरण्यासाठीही पाणी मिळेनासे झाले आहे. त्यामुळे लोकांत तीव्र संताप व्यक्त होत होती o.
नागरिकांनी आ.अभय पाटील आणि नगरसेवक गिरीश धोंगडी या कामाबद्दल समाधान व्यक्त करत आभार मानले.