Home / Political / CM शिवकुमार यांच्या खेळीनं भाजपा विकेट; क्रॉस व्होटिंगमुळे काँग्रेसनं ५ जागा जिंकल्या

CM शिवकुमार यांच्या खेळीनं भाजपा विकेट; क्रॉस व्होटिंगमुळे काँग्रेसनं ५ जागा जिंकल्या

CM शिवकुमार यांच्या खेळीनं भाजपा गारद; क्रॉस व्होटिंगमुळे काँग्रेसनं ५ जागा जिंकल्या

बंगळुर – कर्नाटक विधान परिषदेच्या ७ जागांसाठी गुरुवारी मतदान पार पडले. याचे निकाल आता समोर आले आहेत. या निवडणुकीत मुख्यमंत्री डी.के शिवकुमार यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ५ जागा जिंकल्या आहेत.संख्याबळानुसार काँग्रेसचे ४ उमेदवारांचा विजय निश्चित होता. परंतु एका अतिरिक्त जागेवर पक्षाने उमेदवार उतरवला. तो उमेदवारही निवडून आणण्यात काँग्रेसला यश आले आहे. या निवडणुकीत भाजपाने २ जागांवर विजय मिळवला आहे.

या निवडणुकीत सर्व २२२ आमदारांनी मतदान केले. त्यात डी.के शिवकुमार यांनी भाजपाला धक्का देत पक्षाच्या २ आमदारांकडून क्रॉस व्होटिंग करून काँग्रेसला मतदान देण्याची खेळी केली. संध्याकाळी ५ वाजता मतमोजणीला सुरूवात झाली होती. त्यात काँग्रेसकडून थिप्पन्नप्पा कामकनूर, पी.वी मोहन, बी.के हरिप्रसाद, शिवन्ना बी.एस. आणि विनय कार्तिक प्रकाश आणि भाजपाकडून लिंगराज पाटील, रघु आर सोबत जनता दलाकडून के. गोविंदराजू निवडणुकीत उभे होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना भाजपा आमदार एस. टी. सोमशेखर यांनी आपण काँग्रेस पक्षाला मतदान केल्याचे कबूल केले. आपल्या मतदारसंघाच्या विकासाच्या हितासाठी आपण काँग्रेस पक्षाला मतदान केल्याचे त्यांनी सांगितले.