बेळगाव महापौर, उपमहापौर निवडणूक 6 फेब्रुवारीला

बेळगाव महापौर, उपमहापौर

निवडणूक 6 फेब्रुवारीला

बेळगाव : बेळगाव महानगर पालिकेच्या महापौर आणि

उपमहापौर पदाची निवडणूक 6 फेब्रुवारी 2023 ही निश्चित

झाल्याचे प्रादेशिक आयुक्त डॉ. महांतेश हिरेमठ यांनी

कळवले आहे.

बेळगाव महानगर पालिकेची निवडणूक झाल्यास

जवळपास सव्वा वर्ष उलटले आहे. मात्र महापौर आणि

उपमहापौर निवडणुकीचा मुहूर्त काही लागत नव्हता.

यासंदर्भात आमदारांनी देखील दोन वेळा निवडणूक होणार

असल्याचे सांगितले होते. नुकतेच 31 जानेवारीला ही

निवडणूक होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते.

मात्र आता ही निवडणूक पुढे ढकलण्यात आली असून ती

आता 6 फेब्रुवारीला निश्चित करण्यात आल्याचे प्रादेशिक

आयुक्त डॉ. महांतेश हिरेमठ यांनी कळवले आहे. महापौर

पदासाठी सामान्य महिला तसेच उपमहापौर पदासाठी

ओबीसी महिला असे आरक्षण यापूर्वीच जाहीर करण्यात

आले आहे. यासंदर्भात अधिसूचना जारी करण्यात येणार

असल्याचे प्रादेशिक आयुक्तांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous post आमदार अभय पाटील यांच्या नाश्‍ते पे चर्चा कार्यक्रमाचा सर्वांकडून कौतुक.
Next post ಈಜಲು ಹೋಗಿದ್ದ ಇಬ್ಬರು ಯುವಕರು ನೀರು ಪಾಲು