आमदार अभय पाटील यांच्या नाश्ते पे चर्चा कार्यक्रमाचा सर्वांकडून कौतुक.
बेळगाव:
बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी नाश्ते पे चर्चा हा उपक्रम, नागरिकांच्या समस्या जाणून घेवून त्यांचे निवारण करण्यासाठी राबविला आहे. शुक्रवारी मल्लिकार्जुन मंदीर वडगाव येथे झालेल्या या उपक्रमाला नागरिकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला.
बहुसंख्य नागरिकांनी आपल्या समस्या मांडून त्यांच्या निवारणाबाबत आमदारांना विनंती केली. यावेळी उपस्थित असणाऱ्या नगरसेवकांनी देखील या समस्या जाणून घेतल्या. मनपा अधिकाऱ्यांना याच्या सूचना करून समस्या निवारणासाठी दक्ष राहण्यास सांगण्यात आले. आ. अभय पाटील यांनी यावेळी बोलताना या भागातील अस्वच्छता निवारण आणि नाला सफाई या कामांसाठी त्वरित पावले उचलण्यासाठी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रम संयोजनासाठी नगरसेविका दिपाली टोपगी, प्रिती कामकर, रेश्मा कामकर, उदय उपरी, सतीश खन्नूकर आदींसह इतरांनी परिश्रम घेतले.