बेळगाव ग्रामीण मतदारसंघात भेटवस्तू वाटपावरून आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांचा अपमान.
बेळगाव : बेळगाव तालुक्यातील होनीहाळ गावामध्ये आज
बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांना
ग्रामस्थांच्या एका गटाकडून विरोधाचा सामना करावा
लागला.
रांगोळी स्पर्धेच्या उद्घाटनासाठी आ. लक्ष्मी हेब्बाळकर
गावात आल्या होत्या. त्यावेळी त्यांना भाजप समर्थक
ग्रामस्थांच्या रोषाचा सामना करावा लागला. रांगोळी
स्पर्धेच्या निमित्ताने मिक्सर देण्याचा आ. लक्ष्मी हेब्बाळकर
यांनी घाट घातला. पण स्वाभिमानी ग्रामस्थांनी नारळावर
हात ठेऊन त्यांनाच मत देण्याची शपथ घेण्याची सक्ती
केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. त्यांच्या कृतीचा नारळ
फोडून निषेध केला व धिक्काराच्या घोषणा दिल्या.
यासंदर्भात ग्रामस्थांसमोर बोलताना भाजप ग्रामीण मंडळ
अध्यक्ष धनंजय जाधव यांनी आ. हेब्बाळकर यांच्या
कृतीचा निषेध केला. दरम्यान, यावेळी होनीहाळमध्ये काही
काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.