सौंदत्ती येथे टाकीत पडून दोन
चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू
बेळगाव
सौंदत्ती :
खेळता खेळता दोन मुलांचा पाण्यात पडून मृत्यू
झाल्याची घटना सौंदत्ती येथे घडली. सदर दुर्दैवी घटना
आज दुपारी 12 वाजता झाला.
मिळालेली अधिक माहिती अशी की, जिल्ह्यातील सौंदत्ती
तालुक्यातील गर्लहोसुर येथे वाल्मिकी भवन इमारतीचे
बांधकाम सुरू आहे. तिथे पाणी संकलनासाठी टाकीची
व्यवस्था करण्यात आली. सदर पाण्याच्या टाकीत चार
वर्षीय दोन्ही मुले तोल जाऊन पडली.
श्लोक शंभूलिंगप्पा गुडी आणि चिदानंद प्रकाश साळुंखे
अशी मृत्युमुखी पडलेल्या मुलांची नावे आहेत. ती प्रगती
पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक खाजगी नर्सरीमध्ये शिकत
होती.
सौंदत्ती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील कारवाई
केली.