“नाश्ते पे चर्चा “नागरिकांशी संवादासाठी आ. अभय पाटील यांचा कृतिशील उपक्रम.
बेळगाव प्रतिनिधी
आपल्या मतदारसंघातील नागरिकांशी संपर्क साधून त्यांच्या समस्या निवारणासाठी सातत्याने कृतिशील असणारे बेळगाव दक्षिणचे आ. अभय पाटील नागरिकांसाठी “नाश्ते पे चर्चा“हा उपक्रम राबविला आहे.
आपल्या विभागातील समस्यांच्या संदर्भात नागरिकांच्या काही तक्रारी असतात त्यांची निवारण करण्यासाठी लोकप्रतिनिधींची चर्चा होणे आवश्यक आहे. हा विचार करून आ. अभय पाटील यांनी या उपक्रमाचे नियोजन केले आहे .
दिवसभर कामाच्या रगड्यात नागरिकांची भेट होत नाही. त्यामुळे दररोज सकाळी “नाश्ते पे चर्चा” हा उपक्रम हाती घेतल्याचे त्यांनी सांगितले आहे.
या कार्यक्रमात नागरिकांनी आपल्या तक्रारी असतील तर त्यांनी लेखी स्वरूपात घेऊन येण्याचे आवाहन केले आहे. या कार्यक्रमात आ. अभय पाटील यांच्या सोबत वार्डाचे नगरसेवक आणि सबंधित अधिकारी वर्ग उपस्थित राहणार आहेत.
दररोज पाच वॉर्डातील नागरिकांसाठी असा हा कार्यक्रम पाच दिवस घेण्याची योजना राबविण्यात आली आहे.