आ.अभय पाटील ह्यांचा नेतृत्व मध्ये दक्षिण विभागात बूथ विजय अभियानाला प्रारंभ
बेळगाव : प्रतिनिधी
भारतीय जनता पक्षाच्या वतीने सोमवारपासून बूथनिहाय विजय अभियानाला प्रारंभ करण्यात आला आहे. बेळगाव दक्षिण मतदारसंघात आ. अभय पाटील यांच्या नेतृत्वाखाली घरोघरी भाजपचा ध्वज फडकविण्याचे अभियान सुरू करण्यात आले आहे.
संपूर्ण राज्यात 50 लाख घरांवर हा ध्वज फडकविण्याचा निर्धार करण्यात आला आहे. दि. 2 जानेवारी ते 12 जानेवारी या कालावधीत हे अभियान होणार आहे, अशी माहिती आ. अभय पाटील यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या प्रगतीसाठी मोठे योगदान दिले आहे.
त्याचप्रमाणे राज्यात मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी विकासकामांना चालना दिली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात भाजपच्या नेतृत्वाखाली विकासाची भक्कम पावले निश्चित करण्यासाठी हे अभियान घरोघरी राबविण्यात येणार आहे. यामध्ये नागरिकांनी सहभागाचे आवाहन करण्यात आले.