ग्रामीणमधून भाजप उमेदवार म्हणून संजय पाटील ह्यांचा नवावर शिक्कामोर्तब..
बेळगाव : प्रतिनिधी
मागील विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजपने ग्रामीण मतदारसंघ गमावला होता. त्यामुळे याखेपेला पुन्हा एकदा ग्रामीणमध्ये भाजपचा झेंडा फडकविण्याचा निर्धार करण्यात आला आहे. यासाठी ग्रामीणचे उमेदवार म्हणून माजी आ. संजय पाटील यांच्या नावावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. त्यांना बहुमताने विजयी करण्यासाठी जिल्ह्यातील अनेक नेत्यांनी कंबर कसली आहे.
मागील काही दिवसांपासून ग्रामीणच्या भाजप उमेदवारीबद्दल काही चर्चा सुरू होती. मात्र, पक्षश्रेष्ठींनी पुन्हा एकदा माजी आ. संजय पाटील यांच्या नावाची निवड केली असल्याने भाजपचा इरादा आणि पुन्हा एकदा संजयदादा हे चित्र निश्चित झाले आहे.
रविवारी सायंकाळी गोमटेश विद्यापीठ येथे आयोजित करण्यात आलेल्या माजी आ. संजय पाटील यांच्या वाढदिवसाच्या अभिष्टचिंतन सोहळ््यात हा निर्धार प्रकट झाला. 50 हजाराहून अधिक नागरिकांच्या उपस्थितीत हा सोहळा गोमटेश विद्यापीठ आवारात पार पडला. यामध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री गोविंद कारजोळ, खा. इरण्णा कडाडी, बेळगाव उत्तरचे आ. अनिल बेनके, दक्षिणचे आ. अभय पाटील, खानापूरचे माजी आ. अरविंद पाटील, माजी आ. महांतेश कवटगीमठ, भाजपचे राज्य प्रवक्ते ॲड. एम. बी. जिरली हे उपस्थित होते.