तवंदी घाटात
चार वाहनांची एकमेकांना
धडक
निपाणी : पुणे-बेंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील
निपाणीजवळील तवंदी घाटातील अमर हॉटेलसमोरील
धोकादायक वळणावर माल वाहतूक करणाऱ्या ट्रकने चार
वाहनांना धडक दिली. या अपघातात चारही वाहनांचे मोठे
नुकसान झाले आहे. रविवारी सकाळी दहा वाजण्याच्या
सुमारास हा अपघात झाला. केवळ दैव बलवत्तर म्हणून
जीवितहानी टळली आहे.
अधिक माहिती अशी, मालवाहतूक ट्रक (एमएच 41, जी
5962) दावणगिरीहून कोल्हापूरकडे निघाला होता. तवंदी
घाटातील तिसऱ्या वळणावर आल्यानंतर ट्रकचा ब्रेक
निकामी झाला. त्यामुळे ट्रकने शेवटच्या वाहनावरील अमर
हॉटेलजवळ एका पाठोपाठ एक अशा चार वाहनांना धडक
दिली.
या अपघातात गडहिंग्लज वरून येणाऱ्या एका दुचाकीला
(एमएच 04, इ 8561) ट्रकने मागील बाजूस धडक
दिल्याने मदन नार्वेकर हे दुचाकीवरून उडून बाजूला फेकले,
त्यांनी हेल्मेट घातल्याने त्यांना कोणतीही इजा झाली नाही,
परंतु दुचाकी ट्रक खाली सापडल्याने चक्काचूर झाली.
एकाच वेळी चार वाहनांचे अपघात झाल्याने सुमारे एक
तास वाहतूक कोंडी झाली. यावेळी रस्ते देखभाल
कंपनीच्या भरारी पथकाने वाहने बाजूला करून वाहतूक
सुरळीत केली. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी
घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. अपघाताची नोंद शहर
पोलिस स्थानकात झाली आहे.