केजीटीटीआय संस्थेचा पायाभरणी समारंभ मजगाव येथे संपन्न
बेळगाव : प्रतिनिधी
मजगाव येथे साकारणाऱ्या नव्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून बेळगावच्या युवावर्गाला उद्योजकतेचे प्रशिक्षण उपलब्ध होईल, असा विश्वास आ. अभय पाटील यांनी व्यक्त केला.
दरवर्षी 4000 युवकांना प्रशिक्षित करण्याचा उद्देश असलेल्या कर्नाटक जर्मन टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (केजीटीटीआय) या संस्थेच्या इमारतीचा पायाभरणी समारंभ बुधवारी उत्साहात पार पडला.
सदर पायाभरणी समारंभ राज्याचे कौशल्य विकास मंत्री डॉ. सीएन अश्वथ नारायण यांच्या हस्ते झाला. यावेळी बोलताना आ. अभय पाटील यांनी या केंद्राबद्दल आपले मनोगत व्यक्त केले.
उच्च शिक्षण मंत्री सी.एन. अश्वथ नारायण यांनी सरकारच्या योजनांची माहिती दिली. या कार्यक्रमाच्या वेळी खा. इरण्णा कडाडी , भाग्यनगरचे नगरसेवक अभिजित जवळकार यांच्यासह निमंत्रित मान्यवर कार्यक्रमात सहभागी झाले होते.